नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. एकीकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा जोर कायम असतानाच दुसरीकडे अर्जुन तेंडुलकरच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडमध्ये खळबळ उडाली आहे. अर्जुनने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
VIDEO : अर्जुन तेंडुलकरच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडमध्ये खळबळ - lords cricket
अर्जुन भारतीय अंडर-19 संघाचा खेळाडू आहे.
![VIDEO : अर्जुन तेंडुलकरच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडमध्ये खळबळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3594351-1012-3594351-1560858544320.jpg)
इंग्लंडमधल्या एमसीसी यंग क्रिकेटर्स आणि सरे क्रिकेट यामध्ये सामना रंगला होता. डावखुरा गोलंदाज अर्जुन इंग्लंडमधल्या एमसीसी यंगकडून खेळत होता. नाणेफेक जिंकून सरे संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकात अर्जुनला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर समोरच्या फलंदाजाचा सुरेख त्रिफळा उडवला. अर्जुनने टाकलेला हा वेगवान चेंडूचा व्हिडिओ खुद्द लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने शेअर केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडिओमुळे अर्जुनला लोकांनी चांगलीच दाद दिली आहे. अर्जुन भारतीय अंडर-19 संघाचा खेळाडू आहे.