लंडन -आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम महामुकाबला लॉर्ड्सवर सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध सावध सुरुवात केली. अंतिम सामना खेळणाऱ्या या दोन्ही संघानी आतापर्यंत एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही. परंतू लॉर्ड्सच्या मैदानावर एक खेळाडू उपस्थित आहे ज्याने विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याचे सुख अनुभवले आहे.
क्रिकेटला नवा जेता मिळणार..मात्र मैदानात आहे विश्वकरंडक उंचावणारा 'एक' खेळाडू - kumar dharmasena
धर्मसेना हे 1996 मध्ये खेळवल्या गेलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमधील श्रीलंका संघाचे भाग होते.
या खेळाडूचे नाव आहे कुमार धर्मसेना. आजच्या सामन्यात धर्मसेना हे पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. 1996 मध्ये खेळवल्या गेलेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे जेतेपद श्रीलंका संघाने जिंकले होते. आणि धर्मसेना हे त्या संघाचे भाग होते. त्यांचा अंतिम सामन्याच्या संघातही समावेश केला होता. या सामन्यात त्यांनी स्टिव्ह वॉ यांची विकेट घेतली होती.
या सामन्यापूर्वी धर्मसेना आणि जेसन रॉयच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उपांत्य सामन्यात रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. पण आपण आऊट नसल्याचे सांगत रॉयने कुमार धर्मसेना आणि मरियस इरॅस्मस या पंचांशी भर मैदानातच राडा घातला होता. पण आज रॉय आणि धर्मसेना यांच्या गळाभेटीमुळे हा वाद मिटला गेला आहे.