कार्डिफ -क्रिकेटविश्वात काहीही घडू शकते असे म्हटले जाते. सध्या चालू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याची प्रचिती आली. इंग्लंडच्या गोलंदाजीचा बाण अशी ओळख असलेल्या जोफ्रा आर्चरचा गोलंदाजी करत असताना एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला.
हे जरा विचित्रच...जोफ्रा आर्चरने गोलंदाजी करताना मारला षटकार - soumya sarkars wicket
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आर्चरने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला.

शनिवारी कार्डिफ मैदानावर इंग्लंड विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये आर्चरने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला. सोफिया गार्डन्सवर १४३ ताशी प्रती किमी वेगाने टाकलेल्या आर्चरच्या चेंडूने बांगलादेशचा फलंदाज सौम्या सरकारच्या यष्ट्या उडवल्या. शिवाय, यष्ट्यांना लागलेला हा चेंडू थेट सीमापार गेला.
इंग्लंडच्या आर्चरने टाकलेला चौथ्या षटकाचा पहिला चेंडू यष्टीवर आदळून यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे गेला. या विचित्र प्रकाराने सर्व आश्चर्यचकित झाले आहेत.