लंडन - विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथॅम्पटनमध्ये खेळणार आहे. त्यासाठी संघाचा कसून सराव सुरू आहे. या सरावादरम्यानच वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला उत्तेजक चाचणीसाठी नेण्यात आले.
CRICKET WORLDCUP - भारताच्या ओपनिंग सामन्यापूर्वीच बुमराहची डोपिंग टेस्ट, सरावादरम्यानच घेऊन गेले वाडाचे अधिकारी
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथॅम्पटनमध्ये खेळणार आहे.सरावादरम्यानच वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला उत्तेजक चाचणीसाठी नेण्यात आले.
जसप्रीत बुमराह
जसप्रित बुमराह आज जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. सोमवारी वाडाकडून त्याची उत्तेजक द्रव्य चाचणी करण्यात आली. सराव सुरू असताना उत्तेजक नियंत्रक अधिकारी त्याला उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी घेऊन गेले. ही चाचणी दोन टप्प्यात करण्यात आली. पहिल्या चाचणीत युरीन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर पाऊण तासाने बुमराहच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संस्था वाडाकडून क्रिकेटपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी केली जाते.