मुंबई - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने भारतीयांचे विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. पराभव झाला असला तरी संपूर्ण स्पर्धेत भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ९ सामन्यात १८ बळी घेत आपली छाप पाडली. बुमराच्या या कामगिरीवर चाहते भलतेच खूष झाले आहेत. आणि आता या चाह्त्यांमध्ये एका आजीबाईंची भर पडली आहे.
आजीबाईंनी केली बुमराहची नक्कल...सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - grandmother
जसप्रीत बुमराहने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ९ सामन्यात १८ बळी घेतले आहेत.
आजीबाईंनी केली बुमराची नक्कल...सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या आजीबाईंनी चक्क बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल केली आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराटने बुमराहच्या हटके गोलंदाजीची नक्कल केली होती. आता या आजीबाईंनी केलेल्या या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत यॉर्कर किंग बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने २७ बळी घेत अव्वल स्थान काबीज केले आहे.