लंडन -बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'भारत' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात दाखवलेल्या सलमान खानच्या विविध भूमिका लोकांना भूरळ पाडत आहेत. विश्वकरंडक स्पर्धा खेळायला गेलेल्या भारतीय संघाला देखील भारत चित्रपट पाहण्याचा मोह आवरता आला नाही. चित्रपट पाहून आल्यानंतर भारतीय संघाचा खेळाडू केदार जाधवने सिनेमागृहाबाहेर एक खास फोटो सलमानला ट्विट करुन पोस्ट केला आहे.
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये पाहिला चक्क 'भारत' - salman khan
भारत चित्रपटात दाखवलेल्या सलमान खानच्या विविध भूमिका लोकांना भूरळ पाडत आहेत.
या फोटोमध्ये हार्दिक पांड्या, एम. एस. धोनी, शिखर धवन, के. एल. राहुल हे खेळाडू असून केदारने या फोटोला ‘भारत की टीम भारत मुव्ही के बाद’, असे कॅप्शन दिले आहे. सलमान खानने देखील या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सलमानने हा सिनेमा पाहिल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे आभार मानले आहे. त्याने म्हटले आहे, ‘भारत आवडल्याबद्दल भारतीय टीमला धन्यवाद. इंग्लंडमध्ये भारत सिनेमा पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. पुढील समान्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण भारत तुमच्या सोबत आहे.’