महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वकरंडक स्पर्धेपासून वंचित अंबाती रायडू क्रिकेटच्या सर्व स्तरांतून निवृत्त, खेळणार 'या' देशाकडून? - अंबाती रायडू क्रिकेटच्या सर्व स्तरांतून निवृत्त!

रायडूने बीसीसीआयला लेखी निवृत्ती कळवली आहे

विश्वकरंडक स्पर्धेपासून वंचित अंबाती रायडू क्रिकेटच्या सर्व स्तरांतून निवृत्त !

By

Published : Jul 3, 2019, 1:34 PM IST

Updated : Jul 3, 2019, 2:40 PM IST

नवी दिल्ली -भारतीय संघाच्या मध्य फळीतील फलंदाज अंबाती रायडूने क्रिकेटच्या सर्व स्तरांतून अचानक निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. रायडूने बीसीसीआयला तसे लेखी कळवले आहे. विश्वकरंडक स्पर्धेत विजय शंकरच्या जागी रायडूला वगळण्यात आले होते. विजय शंकर स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर रायडूच्या नावाची चर्चा होती. परंतू मयंक अगरवालला स्थान देण्यात आले आहे.

रायडूने ५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून आतापर्यंत एकही कसोटी सामना त्याला खेळता आलेला नाही.आयपीएलमध्ये रायडूने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कडून खेळताना चांगले प्रदर्शन केले होते.

आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली होती. शिवाय, आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी कोणत्या कादगपत्रांची गरज लागते, याची माहितीही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पाठवली होती.

Last Updated : Jul 3, 2019, 2:40 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details