मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाचा धावांनी पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली आहे. या सामन्याच्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिज संघाला पेलवलेचे नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १२५ धावांनी जिंकला.
अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ४ बळी घेतलेल्या मोहम्मद शमी याही सामन्यात ४ बळी मिळवले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी २ बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने एक एक बळी मिळवला.