महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CWC IND VS BAN : बांगलादेशी वाघांची शिकार करुन भारत उपांत्य फेरीत दाखल - india vs bangladesh

बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवून भारताने उपांत्य फेरी दणक्यात धडक दिली आहे. भारताने दिलेले ३१५ धावांचे आव्हान बांगलादेशला पेलवले नाही व बांगलादेशचा संपूर्ण संघ २८६ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेत बांगलादेशला जोरदार तडाखा दिला. हार्दिक पांड्याने ३ बळी मिळवून भारताच्या विजयामध्ये हातभार लावला.

CWC IND VS BAN : बांगलादेशी वाघांची शिकार करुन भारत उपांत्य फेरीत

By

Published : Jul 2, 2019, 8:18 AM IST

Updated : Jul 2, 2019, 11:49 PM IST

बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे ३१५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशने सर्वबाद २८६ धावा केल्या. भारताने हा सामना २८ धावांनी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेशकडून साकिब अल हसन आणि मोहम्मद सैफूद्दीन याने अर्धशतकी खेळी केली. मात्र, तेही आपल्या संघाचा पराभव वाचवू शकले नाही. जसप्रीत बुमराह याने ४ विकेट घेत बांगलादेशच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले.

बांगलादेश संघाची सुरूवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या ३९ असताना सलामीवीर तमीम इक्बाल बाद झाला. त्यानंतर सौम्या सरकार आणि साकिब अल हसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सौम्या सरकार वैयक्तिक ३३ धावा काढून बाद झाला. तेव्हा मुस्तफिजूर रहिम आणि साकिब अल हसनने संघाला शंभरी पार करुन दिली. तेव्हा वेगाने धावा जमवण्याच्या नादात मुस्तफिजूर बाद झाला.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या लिटन दास आणि साकिबने संघाचा धावफलक हलता ठेवला. संघाची धावसंख्या १६२ असताना दास बाद झाला. एकीकडून साकिब अल हसनने अर्धशतक झळकावले. तेव्हा मुस्सद्दीक हुसेन बाद झाला. धावगती वाढण्याच्या नादात साकिब वैयक्तिक ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर नाबाद राहून मोहम्मद सैफूद्दीनने संघाचा पराभव वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सामन्यात जसप्रीत बुमराहने ४ बळी मिळवले. तर त्याला हार्दिक पांड्याने ३ गडी बाद करत त्याला साथ दिली. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि चहलने प्रत्येकी एक बळी मिळवला.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या शतकाच्या बळावर बांगलादेशसमोर ३१५ धावांचे आव्हान ठेवले होते. रोहितने ९२ चेंडूत १०४ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये ७ खणखणीत चौकर व ५ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. सलामीवीर के एल राहुलने ७७ धावा करून त्याला बहुमोल साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २९.२ षटकात १८० धावांची मजबूत भागीदारी केली.

सलामी जोडीच्या चांगल्या भागीदारीनंतरही भारतीय संघाच्या मधल्या फळीचे दुखणे पुन्हा एकदा समोर आले व चांगल्या सुरूवातीनंतरही भारताचा डाव ३१४ धावांत आटोपला. निर्धारित ५० षटकात भारताने ३१४ धावा करून बांगलादेशसमोर ३१५ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहीमने ५ विकेट घेत भारताच्या धावगतीवर अंकुश ठेवला व संघाला सामन्यात परत आणले.

भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकोश राहुल याने सार्थ करुन दाखवला. त्यांनी १८० धावांची सलामी दिली. त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्मा ९२ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने १०४ धावांनी खेळी केली. त्यानंतर संघाची धावसंख्या १९५ असताना लोकेश राहुल ७७ धावांवर बाद झाला.

तेव्हा कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मैदानावर स्थिरावल्याचे चिन्ह दिसत असताना कर्णधार कोहली २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या शुन्यावर पव्हेलियनमध्ये परतला. तेव्हा पंत आणि महेंद्र सिंह धोनीने मोर्चा सांभाळला. तेव्हा फटकेबाजी करण्याच्या नादात ऋषभ पंत बाद झाला.

तेव्हा धोनी आणि दिनेश कार्तिकने धावगडी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अयशस्वी ठरले. दिनेश कार्तिक संघाची धावसंख्या २९८ असताना बाद झाला. त्यानंतर धोनी शेवटच्या षटकात ३३ चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर लागोपाठ भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने फक्त मैदानावर हजेरी लावून परतले.

एक वेळ भारतीय संघ चारशेच्या घरात धावसंख्या उभारणार असे दिसू लागले होते. मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या मुसक्या आवळत मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. सामन्यात मुस्तफिजूर रहिमने ५ गडी बाद करत भारतीय संघाचे कंबरडे मोडले.

LIVE UPDATE -

  • भारताचा २८ धावांनी विजय

  • बांगलादेशच्या सर्वबाद २८६ धावा

  • बुमराहने दिला ९ वा बांगलादेशला धक्का

  • मोहम्मद सैफुद्दीनचे अर्धशतक पूर्ण

  • बांगलादेशला २७ चेंडूत ४६ धावांची आवश्यकता

  • बांगलादेशला आठवा धक्का भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर धोनीने मश्रफे मोर्तझा याचा घेतला झेल

  • बांगलादेशला सातवा धक्का; शब्बीर रहमान बाद

  • मोहम्मद सैफुद्दीन व शब्बीर रहमानची ५० धावांची भागीदारी

  • साकिब अल हसनने अर्धशतकी खेळू करुन माघारी परतला.

बांगलादेश ३४ षटकात ६ बाद १७९ धावा केल्या आहेत.

  • बांगलादेशच्या ३० षटकात ४ बाद १६३ धावा

  • तमीम इक्बाल माघारी, मोहम्मद शमीने घेतला बळी

  • ३१५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशला पहिला धक्का

  • भारत ५० षटकात ९ बाद ३१४ धावा

  • भारताच्या ४५ षटकात ५ बाद २७० धावा

  • भारतीय संघाला दुसरा धक्का, लोकेश राहुल बाद

  • भारतीय संघ ३१ षटकात १ बाद १८४ धावा

  • कर्णधार विराट कोहली मैदानात

  • रोहित शर्मा ९२ चेंडूत १०४ धावा काढून बाद

  • रोहित शर्माचे शतक; स्पर्धेतील हे ४ थे शतक

  • भारताच्या २५ षटकात बिनबाद १६२ धावा

  • भारताच्या १८ षटकात बिनबाद १०५ धावा पूर्ण

  • रोहित- राहुलच्या जोडीने दिली नाबाद शतकी सलामी
  • भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण

  • भारताच्या १५ षटकात बिनबाद ८८ धावा झाल्या आहेत.

  • रोहितचे वनडेमधील हे ४३ वे अर्धशतक आहे. अर्धशतकीय खेळीत रोहितने चार चौकार आणि तीन षटकार लगावले.

  • मिळालेल्या जीवदानाचा रोहित शर्माने पुरेपूर फायदा उचलला असून ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.

  • सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने या दोघांनी १४ षटकात बिनबाद ७८ धावा केल्या आहेत.

  • भारताच्या सात षटकात ३६ धावा झाल्या आहेत. रोहित (२३) तर लोकेश राहुल (११) धावांवर नाबाद आहे.

  • रोहित शर्माला जीवदान : भारताचा सलामीवीर रोहित शर्माला नऊ धावांवर तमीम इक्बालने झेल सोडून जीवदान दिले.

  • भारतीय सलामीवीर रोहित शर्मा, लोकेस राहुल मैदानात
  • नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय
  • Last Updated : Jul 2, 2019, 11:49 PM IST

    ABOUT THE AUTHOR

    ...view details