हैदराबाद -आज आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठीही खूप महत्त्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. भारत - पाक क्रिकेट मुकाबला खेळाच्या इतिहासात सर्वात रोमांचक मुकाबल्यांपैकी एक असतो. भारत-पाकिस्तानमध्ये जगाच्या कोणत्याही देशात सामना असला तरी जगभरातील क्रिकेटचाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या असतात. भारत-पाक या पारंपारिक प्रतिद्वद्वी संघाचा इतिहास जवळपास सात दशक पुराना आहे. परंतु अजूनही दोन्ही संघामधील सामना रोमांचक होतो व क्रिकेटप्रेमींच्या ह्रदयाचे ठोके वाढले जातात.
भारत - पाक क्रिकेट इतिहासाची सुरुवात 1952 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यापासून झाली. त्यानंतर हे दोन्ही देश वनडे व टी-20 सामन्यात अनेक वेळा आमने-सामने आले मात्र भारताने टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारात पाकिस्तानला मात दिली आहे.
भारत-पाक दरम्यान टेस्ट, वनडे आणि टी-20 सामने -
- पहिला कसोटी सामना ऑक्टोबर 1952 मध्ये दिल्लीत खेळला गेला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये 59 टेस्ट मॅच खेळले गेले आहेत.
- दोन्ही देशांमध्ये पहिला एकदिवसीय सामना ऑक्टोबर 1978 मध्ये क्वेटा येथे खेळला गेला. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 132 वनडे सामने खेळविण्यात आले आहेत.
- पहिला टी-20 सामना 14 सप्टेंबर 2007 रोजी दरबान येथे खेळला गेला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये टी-20 क्रिकेटचे आठ सामने झाले आहेत.
- सीमेवर तनावाची स्थिती असल्याने दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सामने स्थगित झाले. शेवटचा कसोटी सामना 2007 मध्ये खेळला गेला होता.
- भारत - पाकिस्तानमध्ये 59 कसोटी सामन्यांपैकी भारताने 9 तर पाकिस्तानने 12 टेस्ट सामने जिंकले आहेत. तर 38 सामने अनिर्णित राहिले आहेत.
- भारत-पाकिस्तानमध्ये पहिला एकदिवसीय सामना 1 ऑक्टोबर 1978 रोजी क्वेटा येथे खेळविण्यात आला होता. हा सामना भारताने चार धावांनी जिंकला होता.
- दोन्ही संघादरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना जून 2019 मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता.
भारत vs पाकदरम्यान पहिला एकदिवसीय सामना -
भारत-पाकिस्तान संघामध्ये खेळल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने निर्धारित 40 षटकांत सात विकेट गमावून 170 धावा केल्या होत्या. या सामन्यात मोहिंदर अमरनाथने 51 धावा तर सुरिंदर अमरनाथ यांनी 37 व दिलीप वेंगसरकरने 34 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने माजिद खानच्या 50 धावांच्या बळावर 40 षटकात आठ विकेट गमावून 166 धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताने चार धावांनी विजय मिळवला. भारताकडून मोहिंदर अमरनाथ व बिशन सिंह बेदी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.