हैदराबाद - आयसीसी बोर्डाची आज (शुक्रवार) बैठक पार पडली असून यात टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, 2021 साली होणारी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. तर, 2022 साली होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा हा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.
हेही वाचा -देशातील पहिली 'किसान रेल्वे' नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाहून बिहारकडे रवाना
नियोजित वेळापत्रकानुसार टी-20 विश्वचषक स्पर्धा 2020 ही ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाणार होती. तर, 2022 मध्ये याच स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार होते. मात्र, चालू वर्षात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्व जग ठप्प झाले आहे. त्यामुळेच यावर्षीची टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली. तर, पुढील वर्षी भारतातच टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
तसेच प्राप्त माहितीनुसार, 50-50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचे 2023 सालचे यजमानपद देखील भारताकडेच असणार आहे. बांगलादेश, श्रीलंकेसह भारताकडे या स्पर्धेचे यजमान पद असणार आहे.