लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. काल झालेल्या भारत-श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया- आफ्रिका सामन्याने सेमीफायनलची गणितं सुटली आहेत.
CRICKET WC : सेमीफायनलची गणितं सुटली, भारत न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंडशी भिडणार - ind vs nz
भारत-श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया- आफ्रिका सामन्याने सेमीफायनलची गणितं सुटली आहेत.
भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकी खेळीने श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. तर, आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला. त्यामुळे स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताने अव्वल तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान काबीज केले आहे. या क्रमवारीमुळे भारताचा न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडशी सामना होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या सेमीफायनलचा सामना मंगळवारी 9 जुलैला होईल. तर, दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हा सामना गुरुवारी 11 जुलैला होईल.