नवी दिल्ली -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचे आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न भंगले. या सामन्यातील पराभवाला युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांनी महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्त्री यांना जबाबदार ठरवले आहे.
ईटीव्ही भारतसोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. धोनीमुळे युवराजचे दोन वर्ल्डकप वाया गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उपांत्य फेरीत झालेल्या पराभववाबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, 'ज्या पद्धतीने जडेजा खेळत होता तसे धोनी का खेळला नाही. कारण त्याला आऊट होण्याची भिती वाटत होती.'