महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WC IND VS ENG : भारताला पराभवाचा धक्का..पाकची धाकधूक वाढली, इंग्लंडचे आव्हान कायम - match no 38

निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला.

WC IND VS ENG : भारताला पराभवाचा धक्का..पाकची धाकधूक वाढली, इंग्लंडचे आव्हान कायम

By

Published : Jun 30, 2019, 8:50 AM IST

Updated : Jun 30, 2019, 11:57 PM IST

बर्मिंगहॅम -आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३३७ धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली झुंज दिली, पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि भारताला पहिला पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी हा पहिला पराभवाचा धक्का होता. भारताच्या या पराभवाने पाकिस्तान संघाची धाकधुक वाढली आहे.

इंग्लंडचे ३३८ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर केएल राहुल शुन्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने शतकी भागीदारी केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर धावगती वाढवण्यासाठी फटकेबाजी करण्याच्या नादात कोहली ६६ धावांवर बाद झाला.

त्यानंतर ऋषभ पंत आणि रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माने १०९ चेंडूत १०२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि पंत या दोघांनी इंग्लंडच्या गोलदांजाविरुध्द आक्रमण करण्याचा पावित्रा घेतला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. ही जोडी पंतच्या रुपाने संघाची धावसंख्या २२६ असताना फुटली. पांड्याने ३३ चेंडूत ४५ धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आवश्यक धावगती भारतीय संघाला राखता आली नाही. त्यामुळे दडपण वाढत गेले.

संघाची धावसंख्या २६७ असताना पांड्या बाद झाला. त्यानंतर धोनी आणि केदार जाधव यांच्या जोडीने विजय मिळवण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला. धोनी ३१ चेंडूत ४२ धावांवर तर केदार जाधव १३ चेंडूत १२ धावा करत नाबाद राहिला.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी नियोजनबध्द गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना धावांसाठी झगडायला भाग पाडले. इंग्लंडकडून लियाम प्लंकेटने तीन, ख्रिस व्होक्सने २ बळी घेतले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सलामीची जोडी रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी १६० धावांची सलामी दिली. त्यानंतर शतकी खेळी करुन बेअरस्टो १११ धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडची मधली फळी ढासळली. तेव्हा बेन स्टोक्स आक्रमक खेळी करत ५४ चेंडूत ७९ धावा चोपल्या. इंग्लडचा संघ चारशे गाठणार असे वाटत असताना, मोहम्मद शमीने ५ बळी घेत इंग्लंडच्या संघाचे मनसुबे उधळून लावले. शेवटी स्टोक्सच्या खेळीने इंग्लंड संघाने भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान दिले.

LIVE UPDATE :

  • हार्दिक पांड्या मैदानात
  • रोहित शर्मा १०२ धावांवर बाद
  • रोहित शर्माची झंझावती पारी संपली; भारत ३ बाद १९८ धावा
  • रोहित शर्माचे झंझावत शतक; भारत ३५ षटकात २ बाद १८८ धावा
  • ऋषभ पंत मैदानात
  • भारताला दुसरा धक्का; कर्णधार कोहली ६६ धावावर बाद
  • भारताच्या २६ षटकात १ बाद १३३ धावा २६ षटकात रोहित शर्माने केली चौकाराची बरसात
  • भारताच्या २५ षटकात एक बाद १२० धावा
  • रोहित शर्मा विराट कोहलीची शतकी भागिदारी पूर्ण
  • रोहित शर्मांचे अर्धंशतक पूर्ण
  • कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण; भारताच्या २० षटकात १ बाद ८३ धावा
  • कर्णधार विराट कोहली रोहित शर्मा मैदानात
  • भारताच्या १५ षटकात १ बाद ५३ धावा
  • भारताची संथ सुरुवात; ११ षटकात १ बाद ३१ धावा
  • कर्णधार विराट कोहली मैदानात
  • भारतीय संघाने ३ षटकात एक बाद ८ धावा केल्या आहेत.
  • भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल वोक्सने बाद केले.
  • केएल राहुल आणि रोहित शर्माने डावाची केली सुरूवात
  • इंग्लंडच्या ३३८ धावांना उत्तर देण्यासाठी भारताची सलामीची जोडी मैदानात
  • इंग्लंडने निर्धारीत ५० षटकात ७ बाद ३३७ धावा केल्या आहेत.
  • मोहम्मद शमीचे सामन्यात ५ बळी घेतले.
  • इंग्लडने बेन स्टोकच्या मोक्याच्या क्षणी खेळलेल्या खेळीने भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान ठेवले आहे.
  • मोम्मद शमीने ३ गडी बाद केले.
  • मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर कर्णधार मॉर्गनचा केदार जाधवने घेतला झेल
  • इंग्लंडला दुसरा धक्का; आक्रमक बेअरस्टो १११ धावांवर शमीच्या गोलंदाजीवर बाद
  • इंग्लंड ३० षटकात १ गडी बाद २०२ धावा
  • इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण; भारतीय गोलदाजांची दमछाक
  • जॉनी बेअरस्टोचे शतक; इंग्लंडच्या २९ षटकात १९६ धावा
  • २२.१ षटक, आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात सलामीवरी जेसन रॉय बाद, कुलदीपच्या गोलंदाजीवर जडेजाने घेतला अफलातून झेल
  • २०.१ षटकांत इंग्लंड बिनबाद १५१, इंग्लंडच्या सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी
  • सलामीवीर जेसन रॉयचे अर्धशतक, एकदिवसीय कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक
  • सलामीवीर जॉनी बेअरस्टोचे आक्रमक अर्धशतक
  • १५.३ षटकांत इंग्लंडचे शंभरीपार
  • इंग्लंडची आक्रमक सुरुवात.
  • नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय.

इंग्लंडची या स्पर्धेत सुरुवात चांगली झाली होती. मात्र, श्रीलंका आणि पाकिस्तानकडून त्यांना पराभव पत्करावा लागला असल्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज भारताविरुद्ध त्यांना जिंकावेच लागणार होते. विश्वचषकात भारत आणि इंग्लंड ७ वेळा आमनेसामने आले असून दोन्ही संघांचा प्रत्येकी ३ वेळा विजय झाला आहे.

Last Updated : Jun 30, 2019, 11:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details