लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा २३ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने दिलेल्या ३३९ धावांचे आव्हान कॅरिबियन खेळाडूंना पेलवले नाही. विंडीजचा संघ निर्धारीत ५० षटकात ९ बाद ३१५ धावा करु शकला. या सामन्यादरम्यान आयसीसीने मलिंगा आणि गेलचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या दोघांचा एक संबंध दाखवण्यात आला आहे.
आयसीसीने शेअर केलेल्या मलिंगा आणि गेलच्या फोटोचं रहस्य तुम्हाला माहित आहे का?
या सामन्यामध्ये श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने उत्तम कामगिरी करताना ३ गडी बाद केले.
मलिंगा आणि गेलने आतापर्यंत 785 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आणि हेच रहस्य आयसीसीने हा फोटो शेअर करताना सांगितले आहे.
या सामन्यामध्ये श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने उत्तम कामगिरी करताना ३ गडी बाद केले. तर गेलने दोन षटकार आणि एका चौकारासह ३५ धावा काढल्या. श्रीलंकेने वेस्ट इंडिजपुढे ३३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विडींजचे फलंदाज ढेपाळले. एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना, निकोलसने शतक झळकावत संघाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, पुरन मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने विंडिजचा पराभव झाला.