महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या ग्लोव्हजवरील सेनेचे चिन्ह हटवा; आयसीसीची बीसीसीआयला विनंती - नवी दिल्ली

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने ग्लोव्हजवर पॅरा स्पेशल फोर्सच्या चिन्हाचा वापर केला होता. धोनीच्या ग्लोव्हजवरी चिन्ह हे बलिदान बिग्रेडचे आहे. फक्त पॅरा मिलिटरीचे कमांडोच हे चिन्ह वापरू शकतात.

महेंद्रसिंह धोनी

By

Published : Jun 6, 2019, 10:15 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल (बुधवार) सामना झाला. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने ग्लोव्हजवर पॅरा स्पेशल फोर्सच्या चिन्हाचा वापर केला होता.

धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह हटवण्याबाबत बीसीसीआयला आयसीसीने सांगितले आहे. याबाबत आयसीसीचे महाप्रबंधक क्लेयर फरलाँगने बीसीसीआयला कळवताना सांगितले की, धोनीच्या ग्लोव्हजवरी चिन्ह हे बलिदान बिग्रेडचे आहे. फक्त पॅरा मिलिटरीचे कमांडोच हे चिन्ह वापरू शकतात.

महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह

आयसीसीचा नियम काय सांगतो-

आयसीसीच्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यात आयसीसीच्या कपड्यांवर किंवा अन्य कोणत्याही वस्तूंवर राजकारण, धर्म आणि रंगभेदी सारख्या गोष्टींना संदेश देणाऱ्या कोणत्याही चिन्हाचा वा बाबींचा वापर करण्यास मनाई आहे.

धोनीला २०११ साली पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळाली होती. धोनीने २०१५ साली पॅरा बिग्रेडचे प्रशिक्षणही घेतले होते. धोनीने ग्लोव्हजवर लावलेल्या चिन्हाबाबत सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details