लॉर्डस -अतिशय रंगतदार आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या फायनल सामन्यात इंग्लडने बाजी मारली. न्यूझीलंडने तोडीस-तोड खेळ केला मात्र, चौकार आणि षटकाराच्या नियमानुसार इंग्लंडने विजय मिळवला. या विजयामुळे जगभरात इंग्लंडचे कौतूक होत आहे. तर, काही खेळाडूंनी याच विजयाबाबत प्रश्नचिन्ह उठवले आहेत.
भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, युवराज सिंग आणि आकाश चोप्रा यांनी आयसीसीच्या चौकार आणि षटकाराच्या नियमाला फटकारले आहे. गंभीरने या आयसीसीला ट्विट करत म्हटले आहे, 'अंतिम सामन्याचा विजेता ठरवण्याबद्दल असलेला आयसीसीचा चौकार आणि षटकाराचा नियम अगदी वाईट आहे. सामना बरोबरीत सुटायला हवा होता. मला इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघ विजेते आहेत.'