लंडन -'न भूतो न भविष्यति' असा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा 2019 चा ऐतिहासिक अंतिम सामना रविवारी पार पडला. अत्यंत चुरशीच्या लढतीत इग्लंड संघाने चौकार षटकारांच्या निकषावर न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यामध्ये बेन स्टोक्सने अफलातून खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडची जन्मभूमी असलेल्या स्टोक्सने इंग्लंडसाठी पहिल्यांदा विश्वचषक उंचावला.
न्यूझीलंडची जन्मभूमी असलेल्या 'या' खेळाडूने इंग्लंडला जिंकवले! - ben stokes
न्यूझीलंडची जन्मभूमी असलेल्या स्टोक्सने इंग्लंडसाठी पहिल्यांदा विश्वचषक उंचावला.
4 जून 1991 साली न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे बेन स्टोक्सचा जन्म झाला. बेन 12 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांची इंग्लंडच्या एका क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली आणि संपुर्ण कुटूंब इंग्लंडला स्थायिक झाले. एका वर्षानंतर कुटूंब परत न्युझीलंडला निघून गेले. मात्र, बेन क्रिकेटसाठी इंग्लंडमध्येच थांबला.
इंग्लंडच्या सामन्यात निवड झाल्यानंतर हा खेळाडू जागतिक पातळीवर नावारुपास आला. स्टोक्सने आतापर्यंत इंग्लंडसाठी 52 कसोटी, 95 वन डे आणि 23 ट्वेंटी 20 सामने खेळले आहेत. लॉर्ड्सवर झालेल्या यंदाच्या विश्वकरंडकाच्या सामन्यामध्ये बेन स्टोक्सला सामनावीर तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.