बर्मिंगहॅम -आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. या सामन्यावेळी दोन दिग्गजांच्या भेटीचा योग जुळून आला.
गुगलच्या मास्टरने घेतली क्रिकेटच्या मास्टरची भेट! - google ceo
बीसीसीआयने या दोघांचा फोटो शेअर केला आहे.
या सामन्यादरम्यान गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. बीसीसीआयने या दोघांचा फोटो शेअर केला आहे. आयसीसी आणि युनिसेफच्या only 4 children उपक्रमाअंतर्गत हा सामना खेळण्यात आला होता. शिवाय, भारतीय संघ पहिल्यांदा भगव्या जर्सीत खेळला. त्यामुळे या सामन्याला वेगळाच रंग प्राप्त झाला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३३७ धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली झुंज दिली, पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि भारताला पहिला पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी हा पहिला पराभवाचा धक्का होता. भारताच्या या पराभवाने पाकिस्तान संघाची धाकधुक वाढली आहे.