नवी दिल्ली -टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि क्रिकेटच्या मैदानावर 'दादा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचा आज ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपल्या या लाडक्या खेळाडूला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.
"आत्ताच्या मुलांना 'दादा'गिरी कळणार नाही"..गांगुलीला वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या शुभेच्छा - #HappyBiirthdayDada
चाहत्यांनी गांगुलीला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.
"आत्ताच्या मुलांना 'दादा'गिरी कळणार नाही"..गांगुलीला वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या शुभेच्छा
सौरव गांगुली भारतीय क्रिकेटला यशस्वी दिशा देणारा कर्णधार मानला जातो. गांगुलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात 1992 साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना केली. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 311 सामन्यांत 11363 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके तर 72 अर्धशतके केली आहेत. कसोटी क्रिकेटचे सांगायचे झाले तर, 113 कसोटीत गांगुलीने 16 शतके आणि 35 अर्धशतकांसह 7212 धावा ठोकल्या आहेत.