नवी दिल्ली -आज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त धोनीच्या चाहत्यांनी त्याला विविध प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर आज धोनीच्या वाढदिनसानिमित्त शुभेच्छांचे वादळच उठले आहे.
#class is permanent..नेटकऱ्यांनी धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - captain cool
धोनीच्या वाढदिनसानिमित्त शुभेच्छांचे वादळच उठले आहे.
#class is permanent..नेटकऱ्यांनी धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
धोनी सध्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत व्यस्त आहे. टीम इंडिया मंगळवारी न्यूझीलंडलसोबत सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. धोनीसाठी ही विश्वकरंडक स्पर्धा सोपी गेली नाही. त्याला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरीही करता आली नाही. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यात तो कसा खेळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी क्रिकेटविश्वात उधाण आले आहे. त्यामुळे भारताने यंदाचा विश्वकप उंचावला तर माहीसाठी ती अजून एक गोड आठवण ठरणार आहे.