महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CRICKET WC : इयान मॉर्गनने 'या' दिग्गजांना मागे टाकत रचला इतिहास - cricket world cup

मॉर्गनच्या या खेळीमध्ये ४ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने आपल्याच गोलंदाजीवर मॉर्गनला बाद केले.

इयान मॉर्गन

By

Published : Jun 18, 2019, 7:55 PM IST

मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत आज ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर यजमान इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना रंगला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने आक्रमक फलंदाजी करत ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. महत्त्वाचे म्हणजे मार्गन याने आपल्या या खेळीत तब्बल १७ षटकांराची 'बरसात' करत एक विक्रम आपल्या नावावर केला.

अफगणिस्तान विरुध्द आक्रमक फलंदाजी करताना कर्णधार मॉर्गनने एक दिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम तीन खेळाडूंच्या नावावर होता. वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल, भारताचा रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलिअर्स आणि यांनी एका डावात 16 षटकार ठोकले होते. आता मॉर्गनने त्यांना मागे टाकले आहे.

मॉर्गनने भारताचा रोहित शर्मा, वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलिअर्स यांना मागे टाकले आहे.

मॉर्गनने आजच्या सामन्यात ५७ चेंडूंमध्ये शतक झळकावले. मॉर्गनच्या या खेळीमध्ये ४ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने आपल्याच गोलंदाजीवर मॉर्गनला बाद केले.

विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने ४ लढतींमधून तीन विजयांसह ६ गुणांची कमाई केली असून इंग्लड आज चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details