सुपर ओव्हर टाय झाली, मग इंग्लड जिंकलाच कसा? - boundary count
उत्कंठावर्धक सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली आणि तिही टाय झाली. मात्र, सुपर ओव्हर टाय झाली असली तरी इंग्लडला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला हे कसे काय?
लॉर्डस - अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वकरंडकावर नाव कोरले. उत्कंठावर्धक सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली आणि तिही टाय झाली. मात्र, सुपर ओव्हर टाय झाली असली तरी इंग्लडला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला हे कसे काय?
मात्र, आयसीसीचा नियम काय सांगतो पाहा...
सुपर ओव्हरमध्येही सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांपैकी कोणी जास्त चौकार लगावले आहेत (पूर्ण डावात आणि सुपर ओव्हरमध्ये) ते पाहिले जाते. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दोन चौकार लगावले, तर न्यूझीलंडला एकही चौकार लगावता आला नाही. संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडपेक्षा इंग्लडने जास्त चौकार लगावले होते. त्यामुळे इंग्लंडला जास्त चौकार लगावल्यामुळे विश्वविजेता घोषित करण्यात आले.