लॉर्ड्स -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा महाअंतिम सामना आज लॉर्ड्सवर रंगतो आहे. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने सावध फलंदाजी करत २७ व्या शतकात तीन विकेटच्या मोबदल्यात १२२ धावा फलकावर लावल्या आहेत. या सामन्याच्या सुरुवातीला एक विशेष गोष्ट घडली. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयने अंपायर कुमार धर्मसेना यांची गळाभेट घेतली. या भेटीचे फोटो सोशन मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
फायनलपूर्वी इंग्लंडच्या जेसन रॉयने घेतली अंपायरची गळाभेट...जाणून घ्या कारण - eng vs nz
आयसीसीने रॉयला आपल्या मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा सुनावली.
या व्हायरल होणाऱ्या फोटोचे कारण खूप खास आहे. ते कारण यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दडले आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर आले होते. सलामीवीर जेसन रॉयने केलेल्या तूफान खेळीमुळे इंग्लंडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. या सामन्यात 20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. पण आपण आऊट नसल्याचे सांगत रॉयने कुमार धर्मसेना आणि मरियस इरॅस्मस या पंचांशी भर मैदानातच राडा घातला होता. या प्रकारामुळे रॉयला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले होते.
आयसीसीने रॉयला आपल्या मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा सुनावली. पण, आजच्या गळाभेटीमुळे हा वाद मिटला गेला आहे.