CRICKET WORLDCUP : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 'युनिव्हर्सल बॉसने' केला 'हा' विक्रम - chris gayle set a record in icc worldcup match against pakistan
विंडीजकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने ३4 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यावेळी 'युनिव्हर्सल बॉस' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने एक विक्रम केला आहे.

युनिवर्स बॉसने केला विक्रम
नॉटिंगहॅम - ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: लोटांगण घातले. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १०५ धावांवर गारद झाला.
Last Updated : Jun 1, 2019, 12:34 PM IST