मुंबई -वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला सकाळी साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये हलवले होते. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता लारानेही एका ऑडियो क्लिपद्वारे प्रकृती स्थिर असल्याचे कळवले आहे.
मुंबईत उपचार घेत असलेल्या ब्रायन लाराची ऑडियो क्लिप व्हायरल - hospital
लाराने एका ऑडियो क्लिपद्वारे प्रकृती स्थिर असल्याचे कळवले आहे.
लारा म्हणाला, 'माझी प्रकृती हळूहळू सुधारत आहे. त्याबद्दल डॉक्टरही आनंदी आहेत. उद्या मी माझ्या हॉटेलवर परतणार आहे.' लाराच्या अँजिओग्राफीमध्ये काहीही गंभीर न आढळल्यामुळे त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुंबईत ब्रायन लाराला अॅडमिट केले म्हणून माध्यमावर मोठी चर्चा होती. मात्र त्याच्या चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नसून, तो आता नॉर्मल आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात येत असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.