लंडन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकणारा भारताचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे धवन पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. धवनच्या जागी पर्यायी खेळाडूंच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र धवनला बदली खेळाडू म्हणून भारतातून कोण येणार याबाबत BCCI ने कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे BCCI ला धवनच पाहिजे असेच दिसून येत आहे.
CRICKET WORLDCUP : BCCI ला धवनच पाहिजे!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने १०९ चेंडूत ११७ धावा करत दमदार शतक झळकावले होते. त्यामध्ये १६ चौकारांचा समावेश होता.
BCCI ला धवनच पाहिजे
BCCI ने म्हटले आहे की, शिखर धवन हा सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दुखापतीच्या काळात तो भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्येच थांबेल आणि त्याच्या प्रकृतीवर व दुखापतीवर BCCI देखरेख ठेवेल असा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने १०९ चेंडूत ११७ धावा करत दमदार शतक झळकावले होते. त्यामध्ये १६ चौकारांचा समावेश होता.