लंडन - सध्या चालू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे. अशातच आणखी एका खेळाडूला दुखापत झाली आहे.
CRICKET WORLD CUP : विश्वकरंडक स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण.. धवनपाठोपाठ 'हा' दिग्गज खेळाडू जायबंदी - mitchell marsh
दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे.

दिग्गज खेळाडू झाला जखमी
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसलाही दुखापत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्टॉइनिसला खेळता येणार नाही. स्टॉइनिसच्या जागी मिचेल मार्शला संघात स्थान देण्यात आले आहे.
याआधी दुखापतीमुळे आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद शहजाद विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले आहेत. तर, आफ्रिकेचाच वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीसुद्धा दुखापतग्रस्त झाला आहे.