महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : फिंच म्हणतो, "पाकिस्तान खूप सुंदर देश आहे" - pakistan is an amazing country

फिंचने पाकिस्तानात होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेबद्द्ल मत व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच

By

Published : Jun 12, 2019, 1:13 PM IST

टाँटन -विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टाँटनच्या कूपर कौंटी मैदानावर आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. मागच्या सामन्यात भारताविरुद्ध पराभव झालेल्या ऑस्ट्रेलियाचे आज पुनरागमनाचे लक्ष असेल. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच याने 'पाकिस्तान खूप सुंदर देश आहे' असे म्हटले आहे.

फिंचने पाकिस्तानात होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेबद्द्ल मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, "पाकिस्तानमध्ये खेळायला खूप मजा येते. चाहत्यांचा उत्साह कमालीचा असायचा. पीएसएलच्या सामन्यांवेळी मैदाने काही मिनिटांत भरून जायची."

आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू खालीलप्रमाणे.

ऑस्ट्रेलियाचा संघ - अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, डेव्हिड वार्नर आणि अ‍ॅडम झॅम्पा.

पाकिस्तानचा संघ - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

ABOUT THE AUTHOR

...view details