महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

VIDEO : भारत- पाक सामन्यातला हा रोमँटिक क्षण...यामुळे व्हायरल झालं हे जोडपं - couple proposing

प्रियकराने सुरुवातीला अंगठी दाखवून भावी आयुष्याबद्दल विचारले.

भारत- पाक सामन्यातला हा रोमँटिक क्षण...यामुळे व्हायरल झालं हे जोडपं

By

Published : Jun 22, 2019, 5:27 PM IST

मॅनचेस्टर -विश्वचषक स्पर्धा म्हटली की भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार हा आलाच. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत परत एकदा भारताने पाकवर विजय मिळवला. या सामन्यातून टीका-टिपण्णीचे खूप व्हिडीओ व्हायरल झाले. आता एक वेगळाच व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय जोडपे प्रपोज करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीला भर स्टेडियममध्येच प्रपोज केले. त्या प्रियकराने सुरुवातीला अंगठी दाखवून भावी आयुष्याबद्दल विचारले. तिने त्याला त्वरित होकार दिल्यावर आजुबाजूच्या चाहत्यांनीसुद्धा मोठा जल्लोष केला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आजवर ६ वेळा आमने-सामने आले आहेत. यात सर्वच्या सर्व म्हणजे ६ वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवून भारताने आपली आघाडी ७-० ने अशी कायम ठेवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details