साऊदम्पटन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज २८ वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन्ही संघात होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे. दरम्यान या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रेहमानने मोठी कामगिरी केली आहे.
IND vs AFG : जे ताहिर आणि झाम्पाला नाही जमले, ते मुजीब-उर-रेहमानने करुन दाखवले! - rohit sharma wicket
मुजीबने रोहितली पाचव्या षटकामध्ये त्रिफळाचीत केले.
आजच्या सामन्यात मुजीब उर रेहमानने भारताचा हिटनमॅन रोहित शर्माला स्वस्तात माघारी धाडले. मुजीबने रोहितला पाचव्या षटकामध्ये त्रिफळाचीत केले. या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय फलंदाजाला बाद करणारा मुजीब पहिलाच फिरकीपटू ठरला आहे. याआधीच्या झालेल्या सामन्यात आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांच्या एकाही फिरकीपटूला भारतीय फलंदाजाला बाद करता आलेले नाही.
आजच्या सामन्यात गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आले आहे. हा सामना साऊदम्पटनच्या द रोज बाऊल मैदानावर खेळण्यात येत आहे.