महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

झिम्बाब्वेचा संघ करणार पाकिस्तान दौरा, सरकारने दिली मान्यता - झिम्बाब्वे क्रिकेट लेटेस्ट न्यूज

“झिम्बाब्वे सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वे क्रिकेटला पाकिस्तान दौरा करण्यास मान्यता दिली आहे'', असे झिम्बाब्वे क्रिकेटने आपल्या ट्विटरवर म्हटले.

Zimbabwe cricket received government permission for tour of pakistan
झिम्बाब्वेचा संघ करणार पाकिस्तान दौरा, सरकारने दिली मान्यता

By

Published : Sep 23, 2020, 8:04 PM IST

हरारे - झिम्बाब्वे सरकारने पुरुषांचा क्रिकेट संघ पाकिस्तानात पाठवण्यासाठी देशाच्या क्रिकेट बोर्डाला मान्यता दिली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वे पाकिस्तान दौर्‍यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.

“झिम्बाब्वे सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वे क्रिकेटला पाकिस्तान दौरा देण्यास मान्यता दिली आहे'', असे झिम्बाब्वे क्रिकेटने आपल्या ट्विटरवर म्हटले.

एका अहवालानुसार झिम्बाब्वेला पाकिस्तान दौर्‍यावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिका वर्ल्ड कप सुपर लीगचा एक भाग असून हे सामने मुलतानमध्ये ३० ऑक्टोबर, १ आणि ३ नोव्हेंबरला खेळवण्यात येतील.

या मालिकेनंतर, झिम्बाब्वेचा संघ ७, ८ आणि १० नोव्हेंबरला रावळपिंडीमध्ये टी-२० सामने खेळणार आहे. गेल्या पाच वर्षांत झिम्बाब्वेचा हा दुसरा पाकिस्तान दौरा असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details