झारखंड - भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानने मंगळवारी झारखंडच्या माँ छिन्नमस्तिका मंदिराला भेट दिली. झहीरसोबत त्याची पत्नी सागरिका घाटगेनेही मंदिरात दर्शन घेतले. या दोघांच्या उपस्थितीदरम्यान मंदिराभोवतीच्या कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.
झहीर-सागरिकाची माँ छिन्नमस्तिका मंदिराला भेट झहीर-सागरिकाची माँ छिन्नमस्तिका मंदिराला भेट झहीर-सागरिकाच्या भेटीची माहिती जिल्हा प्रशासनाला अगोदरच होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. या दोघांनी मंदिरात पूजा केली. मंदिरात आल्यावर मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे स्वागत केले. पूजा झाल्यानंतर झहीर आणि त्याची पत्नी यांनी स्थानिकांसह फोटो क्लिक केले.
झहीर-सागरिकाची माँ छिन्नमस्तिका मंदिराला भेट झहीर-सागरिकाची माँ छिन्नमस्तिका मंदिराला भेट झहीर खानची कारकीर्द -
भारतासाठी झहीरने ९२ कसोटी सामने खेळताना ३११ बळी तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८२ बळी टिपले आहेत. भारताला २००३मध्ये उपविजेता आणि २०११मध्ये विश्वविजेता बनवण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा आहे. झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीरने मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाडगेबरोबर २०१७मध्ये लग्न केले.
हेही वाचा - जसप्रीत बुमराहला या स्पोर्ट्स अँकरने केले 'क्लीन बोल्ड'!