मुंबई- जगातली सर्वात मोठी लीग स्पर्धा, अशी ओळख असलेल्या आयपीएलच्या बाराव्या सत्राला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट संचलन निदेशकपदी असलेल्या झहीर खानने शुद्ध मराठीतून क्रिकेटचाहत्यांना सामने पाहायला येण्याचे आवाहन केले आहे.
VIDEO : झहीर खानचे मुंबईकरांना मराठीतून आवाहन - Mumbaikar
आयपीएलच्या १२ व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार असून पहिली लढत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

झहीर खान
आयपीएलच्या १२ व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार असून पहिली लढत धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत २४ मार्चला वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.
तीन वेळा इंडियन प्रीमियर लीगचा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी झहीर खान २००९, २०१० आणि २०१४ मध्ये खेळला आहे. झहीरने मुंबईकडून खेळताना ३० सामन्यात २९ बळी बाद केले आहेत.