दुबई -क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नंतर आता माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे पहिल्यांदा पालक होणार आहेत. विशेष म्हणजे झहीरच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी सागरिकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून या फोटोत सागरिका आई होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भारताचा माजी गोलंदाज झहीर खानच्या घरी हलणार पाळणा - Zaheer khan sagarika ghatge news
मीडिया रिपोर्टनुसार, झहीर आणि सागरिका आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत करण्यास पूर्णपणे तयार आहेत. या दोघांकडून अद्याप हा बातमी समोर आली नसली, तरी त्यांच्या दोन निकटवर्तीयांनी ही गोड बातमी सांगितली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, झहीर आणि सागरिका आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत करण्यास पूर्णपणे तयार आहेत. या दोघांकडून अद्याप हा बातमी समोर आली नसली, तरी त्यांच्या दोन निकटवर्तीयांनी ही गोड बातमी सांगितली आहे. सागरिका सध्या झहीरसोबत यूएईमध्ये आहे. झहीर हा मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. काही दिवसांपूर्वी झहीरने आपला ४२वा वाढदिवस साजरा केला.या वाढदिवसानिमित्त पार्टीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात सागरिका गर्भवती असल्याचे उघड झाले.
भारतासाठी झहीरने ९२ कसोटी सामने खेळताना ३११ बळी घेतले. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २८२ बळी टिपले आहेत. भारताला २००३ मध्ये उपविजेता आणि २०११मध्ये विश्वविजेता बनवण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा आहे. झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीरने मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाडगेबरोबर २०१७मध्ये लग्न केले आहे.