महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार - सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार

या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झाद्रान याने तुफानी डाव खेळत 30 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी करुन आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवर नेले. त्याने आपल्या डावात 6 षटकार आणि 5 चौकारांसह 230 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

7 चेंडूत ठोकले 7 षटकार

By

Published : Sep 15, 2019, 4:08 AM IST

ढाका- अफगाणिस्तान संघाने बांगलादेशमध्ये खेळल्या जाणार्‍या टी -20 तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा चांगलाच समाचा घेतला. त्यांनी 20 षटकांत 5 बाद 197 धावा केल्या. अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबीनेही 18 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या सामन्यात झाद्रान आणि मोहम्मद नबीने सलग 7 चेंडूत 7 षटकार खेचले.

या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झाद्रान याने तुफानी डाव खेळत 30 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी करुन आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवर नेले. त्याने आपल्या डावात 6 षटकार आणि 5 चौकारांसह 230 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाला विजयासाठी 198 धावांचे लक्ष्य होते, परंतु ही टीम २० षटकांत 169 धावाच करू शकली. अफगाणिस्तानने हा सामना 28 धावांनी जिंकला. यात सर्वोत्तम खेळीसाठी नजीबुल्लाह सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 8 वा टी -20 सामना जिंकला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details