गुवाहाटी -भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. गुवाहाटीच्या मैदानात नियोजित वेळेनुसार हा सामना ७ वाजता सुरू होणार होता. पण नाणेफेक झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी ९.४६ वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, टीम इंडियाच्या जिममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरला झाला आहे. या व्हिडिओत टीम इंडियाच्या खेळाडूंनी चक्क आपल्याच फिटनेस ट्रेनरची धुलाई केली.
हेही वाचा -भाजप खासदार गौतम गंभीरने जेएनयू हल्ल्याचा केला तीव्र निषेध, कठोर शिक्षेची मागणी
या खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहल, रिषभ पंत, आणि संजू सॅमनन यांचा समावेश होता. निक वेब या फिटनेस ट्रेनरसोबत सुरुवातीला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सराव करत असतो. त्याचा सराव झाल्यानंतर फिरकीपटू चहल या ट्रेनरसोबत सराव करायला येतो. मात्र, पंत ट्रेनरला मागून पकडतो आणि चहल या ट्रेनरला गमतीने पंच मारण्यास सुरुवात करतो. पंतने शेअर केलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.
गेल्या २०१९ मधील क्रिकेटचा हंगाम टीम इंडियासाठी सुखदायक असला तरी, २०२० हे वर्ष आव्हानात्मक असणार आहे. टी-२० विश्वकरंडकासोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्ट भारतीय संघासमोर असणार आहे. विराटसेनेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अतिशय नेत्रदीपक कामगिरी करत २०१९ ची समाप्ती केली. हाच फॉर्म भारतीय संघ २०२० मध्ये कायम राखतो का? हे पाहणे रंजक ठरेल.