सिडनी - टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा मोजणारा चहल हा महागडा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. आज शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर (एसीजी) खेळल्या जाणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चहलने १० षटकांत ८९ धावा देऊन फक्त एक गडी बाद केला.
अरेरे... युझवेंद्र चहलने नोंदवला 'नकोसा' विक्रम
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉइनिसला चहलने शून्यावर बाद केले. चहलच्या आधी हा विक्रम लेगस्पिनर पीयूष चावलाच्या नावावर होता. त्याने २००८मध्ये पाकिस्तानविरुद्ध दहा षटकांत ८५ धावा दिल्या होत्या.

भारतासाठी एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. त्याने २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईत १०५ धावा दिल्या होत्या. जागतिक क्रिकेटचे बोलायचे झाल्यास, एकदिवसीय क्रिकेटच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसच्या नावावर आहे. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध लुईसने १० षटकांत ११३ धावा दिल्या होत्या.