महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

केजीएफच्या तिसऱ्या भागात चहल साकारणार 'रॉकीभाई'?

२०१८मध्ये रिलिज झालेला सुपरस्टार यशचा 'केजीएफ' हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता आणि त्याच्या 'रॉकी' या पात्राने देशभर दहशत निर्माण केली होती.

चहल साकारणार 'रॉकीभाई'?
चहल साकारणार 'रॉकीभाई'?

By

Published : Feb 8, 2021, 8:24 AM IST

बंगळुरू - भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांनी केजीएफ स्टार यशला बंगळुरूमध्ये भेट दिली. धनश्री आणि युझवेंद्रने एका रेस्टॉरंटमध्ये यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित यांची भेट घेतली. चहलने सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा - रिषभ पंत : एकीकडे निराशा, दुसरीकडे विक्रम

या फोटोला कॅप्शन म्हणून चहलने 'स्माईल' दिले आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर आपल्या भावना व्यक्त केल्या. केजीएफ थ्रीचा हिरो यूझी भाई, असे एका नेटकऱ्याने लिहिले आहे. २२ डिसेंबर २०२० रोजी चहल आणि धनश्रीचे गुरुग्राममध्ये लग्न झाले. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या चहलने आयपीएलच्या तेराव्या हंगामात १५ सामन्यांत २१ बळी घेतले.

युझवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांनी केजीएफ स्टार यशला बंगळुरूमध्ये भेट दिली.

२०१८मध्ये रिलिज झालेला सुपरस्टार यशचा 'केजीएफ' हा चित्रपट त्यावर्षीचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता आणि त्याच्या 'रॉकी' या पात्राने देशभर दहशत निर्माण केली होती.

केजीएफ २ यावर्षी होणार रिलिज -

केजीएफ २ हा वर्ष २०२० मधील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये यश पुन्हा रॉकी भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. यश व्यतीरिक्त अभिनेता संजय दत्त आणि श्रीनीधी शेट्टी यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे. १६ जुलै २०२१ रोजी 'केजीएफ २' चित्रपट थिएटरमध्ये सर्वत्र झळकेल. सुपरस्टार यशची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा झाली असून ट्रेंड अ‌ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन ही बातमी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details