नवी दिल्ली - क्रिकेटची 'पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर रंगलेला अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात स्टीव स्मिथच्या दुखापतीची घटना सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली. चेंडू लागल्यानंतर स्मिथ जमिनीवर कोसळला तेव्हा आर्चर वगळता सर्व खेळाडू त्याच्याजवळ गेले. आर्चरच्या या वागण्यामुळे तो ट्रोलही झाला. पाकिस्तानच्या शोएब अख्तरनेही त्याच्यावर ताशेरे ओढले.
शोएबने आर्चरसंबधी एक ट्विट केले होते. त्यावर भारताच्या युवराज सिंगने गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. शोएब आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, 'बाऊन्सर हा खेळाचा भाग आहे. पण जेव्हा आपल्या चेंडूने फलंदाज दुखावतो किंवा मैदानावर कोसळतो तेव्हा गोलंदाजाने त्याची चौकशी करणे, त्याच्या दुखापतीविषयी जाणून घ्यायचे असते. स्मिथ जेव्हा जखमी अवस्थेत होता तेव्हा आर्चरने केले ते चुकीचे होते. माझ्यामुळे जखमी झालेल्या फलंदाजाकडे मी प्रथम धाव घेतली आहे'