नवी दिल्ली - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. कारकिर्दीच्या शेवटी माझ्याबद्दल अव्यावसायिक पद्धतीने वागले गेले, असे युवराज म्हणाला. युवराजची गणना भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. भारताच्या टी-20 आणि 2011 च्या विश्वकरंडक विजेतेपदामध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपली खंत मांडताना युवराजने इतर काही खेळाडूंची नावे दिली, ज्यांची उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कारकीर्द असूनही त्यांचा शेवट व्यवस्थित झाला नाही.
युवराजने बीसीसीआयवर ओढले ताशेरे, म्हणाला...
युवराज म्हणाला, 'माझ्यामते माझ्या कारकिर्दीच्या शेवटी माझ्याशी ज्या पद्धतीने वागले गेले ते खूप अव्यावसायिक होते. हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांसारख्या महान खेळाडूंनाही चांगली वागणूक दिली गेली नाही. ''
युवराज म्हणाला, ''माझ्यामते माझ्या कारकिर्दीच्या शेवटी मला ज्या पद्धतीची वागणूक मिळाली ती खूप अव्यावसायिक होती. हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांसारख्या महान खेळाडूंनाही चांगली वागणूक दिली गेली नाही. त्यामुळे हा भारतीय क्रिकेटचा एक भाग आहे. हे मी यापूर्वीही पाहिले आहे, त्यामुळे मला याबद्दल आश्चर्य वाटले नाही. परंतु भविष्यात, जो कोणी इतका वेळ भारतासाठी खेळला आहे आणि जो एका कठीण परिस्थितीतून गेला आहे, तुम्ही त्याला नक्कीच आदर दिला पाहिजे."
युवराजने 10 जून 2019ला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. युवराजने भारताकडून 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 8701, 1900, 1177 धावा केल्या आहेत.