नवी दिल्ली - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने ऋषभ पंत याच्याविषयी कर्णधार विराट कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सल्ला दिला आहे. मागील काही सामन्यात पंतने खराब कामगिरी केली. यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. मात्र, या प्रकरणी युवराजने पंतची बाजू घेत कर्णधार कोहली आणि शास्त्री यांना सल्ला दिला आहे.
युवराज सिंहने पंतविषयी बोलताना सांगितले की, 'पंतवर जर चांगल्या कामगिरीसाठी कायम दबाव टाकण्यात आला, तर तो 'बेस्ट' देऊ शकणार नाही. पंतला अनेक संधी मिळाल्या. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हे सर्व ठीक आहे. पण, पंताला आणखी संधी मिळायला हव्या. या संधी मिळाल्या तरच तो आपली प्रतिभा दाखवू शकेल.'
'महेंद्रसिंह धोनी सारखे खेळाडू एक दिवसात तयार होत नाहीत. त्याला अनेक वर्ष लागतात. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला एक वर्षाचा अवधी आहे. या काळात पंतवर टीम व्यवस्थापनाने विश्वास ठेऊन संधी द्यायला हवी,' असेही युवराज म्हणाला.
हेही वाचा -जाणून घ्या भारत आणि आफ्रिकेदरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक
पंतने परदेशात २ शतके ठोकली आहेत. तो प्रतिभावान खेळाडू असून सध्या त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नेमके काय करावे? हे पंतला सांगितल्यास त्याच्यामध्ये सुधारणा होईल. आपण पंतकडे धोनीच्या जागेवर यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहत आहोत. यामुळे पंतला आणखी संधी देण्याची गरज असल्याचे, युवराने सांगितले.
दरम्यान, पंतला विश्वकरंडक २०१९ पासून चांगली कामगिरी करता आलेली नाही. यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. या विषयी बोलताना, रवी शास्त्री यांनी पंतला सुधारण्याची गरज असल्याचे सांगितले होते. तसेच त्याचे संघातील स्थान धोक्यात असल्याचे संकेत दिले होते, तर कर्णधार कोहलीनेही अप्रत्यक्षपणे, युवा खेळाडूंना ४-५ संधी मिळतील. त्या संधीत चांगली कामगिरी करावी लागेल, अन्यथा संघात स्थान मिळण्याची शाश्ववती नसल्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा -जेव्हा धोनीने जिंकला होता पहिला विश्वचषक आणि सोबतच.. लोकांचा विश्वास