मुंबई - बॉलिवूडमध्ये हल्ली बायोपिक चित्रपटाची क्रेझ वाढली आहे. आतापर्यंत धोनी, सचिन, मेरी कोम यांसारख्या खेळाडूंवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर कपिल देव आणि सायना नेहवाल यांच्यावर चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला प्रश्न विचारण्यात होता, की स्वत: च्या चरित्रपटात कोणत्या अभिनेत्याला पहायला आवडेल? यावेळी युवराजने गंमतीशीर उत्तर दिले.
युवराजने हसत सांगितले, की 'जर असे झाले तर मी स्वत: च ही भूमिका करेन. परंतु असे करणे योग्य ठरणार नाही. कोणाला कोणती भूमिका द्यायची हा निर्णय दिग्दर्शकाच्या हातात असतो. परंतु जर बॉलिवूडमध्ये माझा चरित्रपट तयार होणार असेल, तर मला असे वाटते, की सिद्धांत चतुर्वेदी माझ्या भूमिकेसाठी योग्य आहे.'