लंडन - सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटजगतातील अनेक दिग्गजांनी यावेळी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार कोण? याचे अंदाज मांडायला सुरुवात केलीय. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा भारताचा स्टार खेळाडू युवराज सिंगनेही असाच एक अंदाज वर्तवला आहे, ज्यात त्याने सेमीफायनलमध्ये पोहचणाऱ्या संघाची नावे सांगितली आहेत.
युवराज म्हणतो, हे 'चार' संघ उपात्य फेरीत होतील दाखल; भारतापुढे असेल 'या' संघाचे कडवे आव्हान - ICC
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना हा 14 जुलैला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार आहे.
![युवराज म्हणतो, हे 'चार' संघ उपात्य फेरीत होतील दाखल; भारतापुढे असेल 'या' संघाचे कडवे आव्हान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3568906-671-3568906-1560600067214.jpg)
युवराजच्या मते, 'यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सेमीफायनलमध्ये आरामात पोहोचतील. तर चौथ्या जागेसीठी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या संघामध्ये चुरस पाहायला मिळेल. या स्पर्धेत पाकिस्तानने इंग्लंडवर धक्कादायक विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे ते कधीही धोकादायक ठरू शकतात. भारताचा विचार केला तर, यजमान इंग्लंडकडून भारतीय संघाला कडवी टक्कर मिळेल.'
या विश्वकरंडकात एकूण 10 देशांचे संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडत आहेत. या स्पर्धेत 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. जे 46 दिवस चालणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना हा 14 जुलैला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार आहे.