मुंबई -भारताचा सिक्सर किंग आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे कौतुक केले आहे. ब्रॉडने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडला. या कामगिरीसाठी युवीने ब्रॉडचे अभिनंदन केले आहे.
''500 विकेट्स घेणं हा विनोद नाही'', युवीनं केलं ब्रॉडचं अभिनंदन - yuvraj and broad latest news
युवी म्हणाला, ''मी जेव्हा ब्रॉडविषयी लिहितो तेव्हा त्याच्याविषयी सहा षटकाराचा प्रसंग जोडला जातो. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो, की त्याने जे साध्य केले आहे, त्यासाठी त्याचे अभिनंदन करा. कसोटीत 500 बळी घेणे हा विनोद नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. तू महान आहेस! सलाम.''
2007 च्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत युवराजने ब्रॉडला 6 चेंडुत 6 षटकार ठोकले होते. मात्र, आता ब्रॉडला ही ओळख न देता त्याचे कौतुक करावे, असे आवाहन युवीने आपल्या चाहत्यांना केले. युवी म्हणाला, ''मी जेव्हा ब्रॉडविषयी लिहितो तेव्हा त्याच्याविषयी सहा षटकाराचा प्रसंग जोडला जातो. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो, की त्याने जे साध्य केले आहे, त्यासाठी त्याचे अभिनंदन करा. कसोटीत 500 बळी घेणे हा विनोद नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. तू महान आहेस! सलाम.''
वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत इंग्लंडने 269 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयाचा खरा नायक ठरला वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 6 तर दुसऱ्या डावात 4 बळी घेत विंडीजच्या डावाला खिंडार पाडले. इंग्लंडकडून कसोटीत 500 बळी घेणारा ब्रॉड हा जेम्स अँडरसन नंतरचा दुसराच गोलंदाज ठरला. सामन्याच्या पाचव्या दिवशी विंडीजच्या दुसर्या डावात क्रेग ब्रॅथवेटला बाद करत ब्रॉडने हा कारनामा केला.