महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीसारखी घाण एक दिवस साफ होणार; भारताच्या 'या' माजी खेळाडूचे टीकास्त्र - ambati rayudu

धोनीसारखा घाण एक दिवस साफ होणार आहे. कधी ना कधी निवड समितीमध्ये चांगले लोक येतील, चांगला कर्णधार येईल. रायडू तू हरु नकोस निवृत्तीचा निर्णय माघारी घे आणि पुन्हा मैदानात उतर आणि चांगला खेळ करुन तुझी प्रतिभा दाखवून दे, असे युवराजचे वडिल योगीराजसिंह यांनी सांगितलं.

धोनीसारखा कचरा एक दिवस साफ होणार; भारताच्या 'या' माजी खेळाडूचे टीकास्त्र

By

Published : Jul 9, 2019, 6:08 PM IST

Updated : Jul 9, 2019, 10:42 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडिल योगीराज सिंह यांनी पुन्हा महेंद्रसिंह धोनीवर कडाडून टीका केली आहे. त्यांनी अंबाती रायडू यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर बोलताना निवड समितीसह धोनीला धारेवर धरले.

योगीराज सिंह यांनी अनेक वेळा महेंद्र सिंह धोनीवर जहरी टीका केली आहे. त्यांनी आज पुन्हा अंबाती रायडूच्या निवृत्ती निर्णयावर बोलताना धोनीवर टीकास्त्र सोडते. ते म्हणतात, अंबाती रायडूने अचानकपणे निवृत्ती जाहीर केली. हे ऐकून मला धक्का बसला. रायडू हा प्रतिभावंत खेळाडू आहे. त्याला निवड समितीच्या निर्णयाचा फटका बसला असल्याचे योगिराजसिंह म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले, धोनीसारखा घाण एक दिवस साफ होणार आहे. कधी ना कधी निवड समितीमध्ये चांगले लोक येतील, चांगला कर्णधार येईल. रायडू तू हरु नकोस निवृत्तीचा निर्णय माघारी घे आणि पुन्हा मैदानात उतर आणि चांगला खेळ करुन तुझी प्रतिभा दाखवून दे, असं त्यांनी सांगितलं.

सौरव गांगुली कर्णधार असताना ७ खेळाडू नवखे होते. असे असतानाही, गांगुलीने संघ चांगल्या पध्दतीने हाताळला. संघाला उभारणी देणारा कर्णधार हवा, ते काम गांगुली विराटने केले असल्याचेही योगीराज म्हणाले.

दरम्यान, यापूर्वीही योगीराज यांनी महेंद्रसिंह धोनीवर जहरी टीका केली आहे. विश्वकरंडक सुरू असल्याने मी खेळाडूंचे खच्चीकरण करणार नाही असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, अद्याप विश्वकरंडक संपलेला नसतानाही योगीराजसिंह यांनी धोनीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

Last Updated : Jul 9, 2019, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details