लाहोर -कर्णधारपदाच्या काळात सत्य बोलत होतो. त्यामुळे मला वेडे ठरवले गेले, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानने म्हटले आहे. युनिसने तत्कालिन पाकिस्तानच्या संघसहकाऱ्यांवर वागणुकीवरून ताशेरे ओढले आहेत.
युनिसचा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये समावेश आहे. कसोटीत तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जेव्हा खेळाडूंना देशासाठी शंभर टक्के योगदान द्यायला सांगायचो तेव्हा काही खेळाडूंना मी आवडत नव्हतो, असे युनिसने सांगितले.