महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

17 वर्षाच्या यशस्वीचा भीमपराक्रम, विजय हजारे स्पर्धेत झळकावले द्विशतक

या स्पर्धेतील गट अ मध्ये झारखंड विरुद्ध झालेल्या सामन्यात यशस्वीने २०३ धावांची दमदार खेळी केली. यंदाच्या विजय हजारे स्पर्धेत दुहेरी शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी दुसरे स्थान राखले आहे.

17 वर्षाच्या यशस्वीचा भीमपराक्रम,  विजय हजारे स्पर्धेत झळकावले द्विशतक

By

Published : Oct 16, 2019, 6:51 PM IST

बंगळुरू -मुंबई संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने विजय हजारे स्पर्धेत मोठा पराक्रम करून दाखवला. या स्पर्धेत यशस्वी हा द्विशतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जयस्वाल

हेही वाचा -WI VS AFG : गेल का खेल खत्म..! भारत दौऱ्यात ख्रिससह स्फोटक रसेलला डच्चू

या स्पर्धेतील गट अ मध्ये झारखंड विरुद्ध झालेल्या सामन्यात यशस्वीने २०३ धावांची दमदार खेळी केली. यंदाच्या विजय हजारे स्पर्धेत दुहेरी शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी दुसरे स्थान राखले आहे. काही दिवसांपूर्वी, केरळ संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने गोवा संघाविरूद्ध नाबाद २१२ धावा चोपल्या होत्या. सॅमसन हा विजय हजारे स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधित धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा नववा भारतीय फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत सर्वात पहिल्या द्विशतकाची नोंद मागच्या वर्षी झाली होती. उत्तराखंडच्या कर्णवीर कौशलने सिक्किमविरूद्ध २०२ धावांची खेळी करत पहिल्या द्विशतकवीराचा मान पटकावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details