मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या यशस्वी जयस्वालने आपला जलवा दाखवत सर्वांना चकित केले. आपला 'जादुई' फॉर्म कायम राखत यशस्वीने २३ वर्षांखालील सी. के. नायडू स्पर्धेत मुंबईकडून शतक ठोकले आहे.
हेही वाचा -काय सांगता!...८३ वर्षाच्या वेटलिफ्टरवर डोपिंगप्रकरणी बंदी
वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि पुडुचेरी यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वीने शानदार शतक ठोकले. त्याने २४३ चेंडूत १८५ धावा केल्या. यशस्वीने आपल्या खेळीत १९ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याला मुंबईचा कर्णधार हार्दिक जितेंद्र तमोरेची (८३) उत्तम साथ लाभली.