कोलकाता - भारतीय कसोटी संघाचा भाग असलेला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाची रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी बंगाल संघात निवड झाली आहे. न्यूझीलंड दौर्यावर खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये साहाला स्थान देण्यात आलेले नव्हते.
हेही वाचा -मराठमोळा क्रिकेटपटू अजित आगरकरचा पत्ता कट!
दुखापतग्रस्त कौशिक घोषच्या जागी सुदीप घरामीला बंगाल संघात स्थान देण्यात आले आहे. तर, गुलाम मुस्तफा देखील संघाबाहेर आहे. बंगालने उपांत्य सामन्यात कर्नाटकचा १७४ धावांनी पराभव करत १३ वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांचा सामना सौराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील दुसर्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.
संघ -
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), मनोज तिवारी, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अनुस्तूप मजूमदार, श्रीवत्स गोस्वामी (यष्टीरक्षक), सुदीप चटर्जी, अभिषेक रमन, अर्णब नंदी, शाहबाज अहमद, ईशान पोरेल, श्रेयान चक्रवर्ती, नीलकांत दास, मुकेश कुमार, आकाश दीप, अग्निव पान, सुदीप घरामी.